-
मोमोज हा पदार्थ आजकाल तरुण पिढीचा आवडता पदार्थ ठरला आहे. खूप दिवस मोमोज खाल्ले नसले की, बऱ्याच जणांना चुकल्या चुकल्यासारखे वाटते. काही जणांना वाफवलेले आणि काही जणांना तळलेले मोमोज आवडतात. अनेकदा यापैकी बेस्ट कोणते यावरूनही भांडणे होत असतात.. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
तर वाफवलेले आणि तळलेले यापैकी कोणता पर्याय तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट आहे याबद्दल आज आपण पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्याकडून जाणून घेऊया… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अलीकडच्या मुलाखतीत, ऋजुता दिवेकर यांना उपलब्ध असलेल्या अनेक मोमोज प्रकारांपैकी आरोग्यदायी मोमोज पर्याय कोणता आहे याबद्दल विचारण्यात आले. “सगळे मोमोज वाईटच असतात; जोपर्यंत तुम्ही स्पिती किंवा किन्नौरसारख्या ठिकाणी ट्रेक करीत नाही.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कारण- एखाद्या होमस्टेमध्ये कोणी घरचे, पारंपरिक मोमोज बनवून देत नाही. तेच खरे सांस्कृतिक आणि चविष्ट मोमोज असतात. त्यामुळे मोमोज खाण्याचा मोह टाळता येत नसेल, तर आठवड्यातून एकदाच खा”, असे न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दोन्हीही तितकेच वाईट…
(फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम) -
मुलाखतीत ऋजुता दिवेकर यांना सोया चाप आणि मोमोजमधील आरोग्यदायी पर्याय निवडण्यास सांगितले. “दोन्हीही तितकेच वाईट असतात. जोपर्यंत दुसरे कोणी त्यासाठी पैसे देत नाही”, असे सेलिब्रिटी पोषणतज्ज्ञांनी विनोद करीत म्हटले.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
ऋजुता दिवेकर यांनी ‘डोंट लूज युअर माइंड, लूज युअर वेट’ या पुस्तकात अभिनेत्री करीना कपूरला मोमोज खाण्याची परवानगी कशी दिली याबद्दलही सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
करीनाने लडाखमध्ये मोमोज खाल्ले आणि त्यामुळे तिचे वजन कमी होण्यास मदत झाली. कारण- लडाख ३,५०० मीटर उंचीवर आहे आणि तेथील हवामान कोरडे आणि थंड आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
पण, हेच मोमोज जर करीनाने दमट, उष्ण आणि समुद्रसपाटीवर असणाऱ्या मुंबईत खाल्ले असते. तर तिचे वजन वाढले असते. त्यामुळे तुम्ही कुठे, काय आणि कोणत्या हवामानात खाता यावर तुमचे वजन वाढणे आणि कमी होणे हे ठरते”, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”