-
चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्री वर्षानुवर्षे कसे फिट राहतात, त्यांची त्वचा कशी उजळ दिसते, असा प्रश्न आपल्यातील अनेकांनाच पडतो. त्यांच्या कामाप्रमाणे त्यांचे दैनंदिन रुटीनदेखील आपल्यापेक्षा भरपूर वेगळे असते, असे म्हणायला हरकत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik / actormaddy)
-
१ जून रोजी अभिनेता आर. माधवन ५५ वर्षांचा झाला. तर आज आपण अभिनेता आर. माधवनच्या स्किनकेअर रूटीनबद्दल जाणून घेणार आहोत. ७ जुलै रोजी जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने स्वतः त्याच्या स्किनकेअर रूटीनबद्दल सांगितले.(फोटो सौजन्य: @Freepik / actormaddy)
-
आर. माधवनसारखी चांगली त्वचा मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. जरी सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं तरीही तो पूर्णपणे टाळणं आवश्यक नाही. (फोटो सौजन्य: @Freepik / actormaddy)
-
कारण – सूर्यप्रकाशामुळे मूड सुधारतो, व्हिटॅमिन डीची पातळी वाढते. त्यामुळे अभिनेता ताठ आणि सुरकुत्या नसलेल्या त्वचेचं श्रेय तो सूर्यप्रकाशाला देतो. ‘नारळाचे पाणी, सूर्यप्रकाश व शाकाहारी जेवण’ यांमुळे तो पन्नाशीतही तरुण दिसतो, असे त्याने मुलाखतीत आवर्जून सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आर. माधवन अभिनेत्याला सूर्यप्रकाश सूट होतो. त्याने कोणतेही फीलर्स किंवा त्वचेत बदल करणारे उपचार करून घेतलेले नाहीत. एखाद्या भूमिकेसाठी कधीतरी त्याने फेशियल केलं असेल. पण, उर्वरित त्यांच्या त्वचेचं खरं रहस्य म्हणजे म्हणजे नारळाचे तेल, नारळ पाणी, सूर्यप्रकाश व शाकाहारी आहार आहे, असे तो म्हणाला. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आर. माधवन अभिनेता तंदुरुस्तीसाठी डाळ, भाजी, चवळी यांसारख्या साध्या जेवणावर भर देतो. एकूणच आरोग्याला चालना देण्यासाठी तुमच्या शरीराचे ऐका आणि संतुलित आरोग्यदायी पदार्थ निवडण्याचा आणि तळलेले जेवण, अल्कोहोल टाळण्याचा सल्ला त्याने दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
याचबरोबर आर. माधवनने हेही सांगितले की, तो लहान असताना त्याच्या घरी फ्रिज नव्हता. त्यामुळे त्यांच्या घरी दोन्ही वेळी जेवण नेहमीच ताजे बनवावे लागत असे. ही सवय कायम राहिली. कदाचित म्हणूनच फास्ट फूड, पॅकेज्ड पदार्थ, पुन्हा गरम केलेले पदार्थ किंवा हंगामी नसलेली फळे अभिनेत्याच्या शरीराला आवडत नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
सेटवर असतानाही, अभिनेता त्याच्या शेफला बरोबर घेऊन जाऊन डाळ, भाजी, चवळी, असे साधे जेवण बनवतो. जसे अभिनेत्याची आई बनवायची. त्याचप्रमाणे अभिनेत्याचे आजी-आजोबा ९२ व ९३ वर्षांच्यापर्यंत जगले आणि ते दिवसातून तीन वेळा भात खायचे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
त्यामुळे अभिनेता फक्त शरीराचे ऐकतो, आरामदायी अन्न खातो आणि शक्य तितके तळलेले पदार्थ आणि अल्कोहोल टाळतो. त्याचप्रमाणे अभिनेता फक्त भूक लागल्यावरच जेवतो, वेळेनुसार नाही. त्यामुळे तो सतर्क, आनंदी आणि तरुण राहतो, असे अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”