-
शरीरातील द्रव संतुलन राखण्यासाठी फक्त पाणीच नाही, तर काही फळे व भाज्याही उपयोगी ठरतात. काकडीमध्ये ९६% पाणी असल्यामुळे ती उत्तम हायड्रेटिंग फूड आहे. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
कलिंगड कलिंगड रसाळ व गोडसर असल्याने तहान भागवते. त्यातील पाणी शरीराला ताजेतवाने ठेवते आणि ऊर्जाही देते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर पाणी व अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे हे फळ हायड्रेशनसह रोगप्रतिकार शक्तीसाठीही उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
नारळपाणी नारळपाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा स्रोत आहे. हे शरीराला लगेच ऊर्जा व पाणी पुरवते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
लेट्यूस लेट्यूस हलके असून, त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जेवणात त्याचा समावेश केल्यास हायड्रेशन मिळते. लेट्यूसच्या पानांचे सॅलड बनवूनही खाऊ शकतो. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
दुधी भोपळा दुधी भोपळ्यामध्ये पाणी व फायबर मुबलक असते. त्यामुळे पचन सुधारते आणि शरीर हायड्रेट राहते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
संत्री संत्र्यामध्ये रसाळपणा व क जीवनसत्व आहे. हे फळ ऊर्जा देते आणि पाण्याची कमतरता भरून काढते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
-
या फळभाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीर नैसर्गिकरीत्या हायड्रेट राहते. त्यामुळे निरोगी जीवन जगणे अधिक सोपे होते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)
(हेही पाहा:एक केळे, चार ग्लास पाणी हा आम्लपित्तावर उपाय? व्हायरल हॅकबाबत तज्ज्ञांचे स्पष्टीकरण )

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…