-
मूड बॅलेन्ससाठी उपयोगी
काजू हा नैसर्गिक मूड-बूस्टर मानला जातो. त्यातील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल मेंदूत सेरोटोनिन वाढवते, जे ‘good mood’साठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे ताण, चिडचिड आणि सौम्य नैराश्य कमी करण्यास मदत होते. -
डोळ्यांच्या आरोग्याचा रक्षक
काजूमध्ये असलेले झेक्सॅन्थिन रेटिनाला संरक्षण देतं. हे घटक डोळ्यांना अतिनील किरणांपासून वाचवतात आणि वयाबरोबर होणाऱ्या मोतीबिंदू किंवा मॅक्युलर डीजनरेशनचा धोका कमी करतात. -
स्नायूंसाठी पोषक
काजूमधील भरपूर मॅग्नेशियम मज्जासंस्थेला ताकद देतो. हेच खनिज स्नायूंचे आकुंचन-विश्रांती सुरळीत ठेवते, थकवा कमी करते आणि स्नायूंच्या पेटक्यांपासून बचाव करते. -
त्वचेची नैसर्गिक चमक
तांब्याचा उत्तम स्रोत असलेले काजू त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान आहे. तांबे कोलेजन आणि इलास्टिन निर्मितीला मदत करते, ज्यामुळे त्वचा घट्ट, तेजस्वी आणि तरुण राहते. -
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे
काजूमधील झिंक शरीराच्या इम्युनिटीसाठी अत्यावश्यक आहे. नियमित सेवनाने संसर्गांपासून बचाव, जखमा लवकर भरून येणे आणि हंगामी आजारांपासून संरक्षण मिळते. -
पित्ताशयाच्या खड्यांवर उपाय
संशोधनानुसार, काजू खाणाऱ्यांना पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी असतो. काजूमधील चांगली चरबी आणि सक्रिय घटक पित्तप्रवाह सुरळीत ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल जमा होण्यास आळा घालतात.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा