-
पावसाळ्याच्या दिवसांत मच्छरांचा त्रास खूप वाढतो. संध्याकाळ होताच घरात मच्छरांची संख्या झपाट्याने वाढते आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका अधिक होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
अनेकजण मच्छरांपासून बचावासाठी बाजारातून महागडे स्प्रे आणि केमिकल आणतात. पण, त्याचा परिणाम मच्छरांवरच नाही तर माणसांच्या आरोग्यावरही होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
यावर सोपा उपाय म्हणजे नैसर्गिक पद्धतीचा वापर. घरात आलेल्या मच्छरांना पळवण्यासाठी तुम्ही कापूर वापरू शकता, यामुळे मच्छर घरात प्रवेशही करणार नाहीत. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
मच्छरांना हाकलण्यासाठी तुम्ही कापूर आणि पाण्याचा स्प्रे तयार करू शकता. त्यासाठी दोन कापूर पाण्यात टाका आणि ते मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
तयार केलेल्या या स्प्रेचा वापर घराच्या कोपऱ्यांत, खिडकी-दाराजवळ, बिछान्याच्या आजूबाजूला करा; यामुळे मच्छर लगेच पळून जातील. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
शिवाय, तुम्ही संध्याकाळी घरात कापूर जाळू शकता. एका वाटीत कापूर घेऊन तो पेटवा आणि दरवाजे-खिडक्या काही वेळ बंद ठेवा. कापराच्या वासाने आणि धुराने मच्छर लगेच निघून जातील. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी केल्यास सर्वात जास्त परिणामकारक ठरतो. खोलीत मच्छरांचा त्रास पूर्णपणे कमी होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
घरातील मच्छर पळवण्यासाठी तुम्ही कापूर आणि कडुलिंब तेलाचा दिवादेखील लावू शकता. त्यासाठी दिव्यात तेल घ्या, त्यात एक कापूर टाका आणि रुईची वात ठेवून पेटवा. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
हा दिवा खिडकीजवळ ठेवला तर अधिक परिणामकारक ठरतो, कारण मच्छरांना कडुलिंब आणि कापूरचा वास अजिबात सहन होत नाही आणि ते खोलीत शिरत नाहीत. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: बुमराहच्या यॉर्करवर हरिस रौफची बत्तीगुल! विकेट घेताच केलं भन्नाट सेलिब्रेशन