-
सोशल मीडियापासून तुमचे मानसिक आरोग्य कसे जपावे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
तुमचा फीड क्युरेट करा: तुम्हाला प्रेरणा देतील, तुमच्या ज्ञानात भर घालतील किंवा तुम्हाला आनंद देतील अशाच अकाउंट्स फॉलो करा. तर जे अकाउंट्स नकारात्मकता किंवा तुलना करतात त्यांना अनफॉलो करा.
-
डिजिटल डिटॉक्स: डिजिटल डिटॉक्स: झोपण्यापूर्वी किंवा जेवण करताना फोन वापरणे बंद करा. यामुळे चिंता कमी करण्यास मदत होते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तुम्हाला वास्तविक जगाशी पुन्हा कनेक्ट होता येते.
-
फक्त स्क्रोल करू नका : फक्त यांत्रिक पद्धतीने स्क्रोल करण्याऐवजी पोस्टमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा. कमेट करा, शेअर करा किंवा मित्रांसोबत गप्पा मारा. यामुळे कनेक्शनची भावना वाढेल आणि एकटेपणा कमी होईल.
-
पोस्ट करण्यापूर्वी किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी, थांबा आणि स्वतःला विचारा की, मी हे का करत आहे? सतत ऑनलाइन नकारात्मक भावना व्यक्त करण्याऐवजी खोल श्वास घ्या.
-
वेळेची मर्यादा निश्चित करा: अॅप्सवर तासनतास घालवल्याने डूम स्क्रोलिंग आणि थकवा जाणवू शकतो. बिल्ट-इन स्क्रीन टाइम ट्रॅकर्स (जसे की डिजिटल वेलबीइंग किंवा iOS स्क्रीन टाइम) वापरा आणि दिवसाला ठरवून दिलेली वेळेची मर्यादा पाळा.
-
मदत घ्या: जर सोशल मीडियामुळे चिंता किंवा नैराश्य येत असेल, तर थेरपिस्ट किंवा समुपदेशकाशी बोला.

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा