-
लहानपणी दूध का अनिवार्य?
जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात आईचं दूध हेच सर्वांत पौष्टिक आणि सुरक्षित असतं. त्यानंतर साधं दूध लहानग्यांच्या वाढीसाठी आवश्यक कॅल्शियम आणि प्रोटीन्स पुरवतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
१२ ते २४ महिन्यांच्या मुलांसाठी पर्याय
या वयात हळूहळू गाईचं किंवा फोर्टिफाइड सोया दूध देता येतं. मात्र, ते गोड नसावं आणि फ्लेवरशिवाय असावं, जेणेकरून मुलांना योग्य पोषण मिळेल. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वयानुसार अपचनाच्या समस्या
वयानुसार अनेकांची लॅक्टोज पचवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दूध प्यायल्यावर गॅस, पोट फुगणं किंवा अपचनासारख्या समस्या जाणवू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणं
सतत पोटात गोळे येणं, जुलाब होणं, फुगलेलं पोट दिसणं ही लक्षणं दिसली, तर दूध कमी करणं किंवा थांबवणं गरजेचं असतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सोया दूध – पौष्टिक पर्याय
प्रोटीन्स आणि कॅल्शियमने समृद्ध असलेलं सोया दूध हा प्रौढांसाठी उत्तम पर्याय ठरतो. लॅक्टोज इंटॉलरन्स असणाऱ्यांना हे पचायला सोपं असतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
बदामयुक्त दूध फायदेशीर
हलकं, स्वादिष्ट व व्हिटॅमिन ईनं भरलेलं बदामयुक्त दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन सांभाळणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ओट दूधाची लोकप्रियता
फायबरयुक्त आणि सहज पचणारं ओट दूध आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतंय. कॉफी किंवा स्मूदीमध्येही त्याचा वापर वाढला आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पोषण पूर्तता आवश्यकच
दूध सोडलं तरी कॅल्शियम, व्हिटॅमिन D व B12 यांची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे. म्हणूनच फोर्टिफाइड वनस्पती-आधारित दूध निवडणं योग्य ठरतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शेवटी निर्णय तुमचा
दुध प्यायचं की पर्यायी दूध निवडायचं हा निर्णय प्रत्येकानं आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार घ्यावा. शंका असल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा