-
मिष्टान्न म्हणजे फक्त केक किंवा आईस्क्रीम नाही. जगातल्या प्रत्येक संस्कृतीत असे मधुर आणि खास म्हणतात येतील असे पदार्थ असतात जे खूप खास असतात. आज आम्ही तुम्हाला जगात पसंत केल्या जाणाऱ्या खास मिष्टान्नांबाबत सांगणार आहोत.
-
मलेशियामध्ये एस काकांग नावाचा एक पदार्थ मिष्टान्न म्हणून खाल्ला जातो. यामध्ये स्वीट कॉर्न, सिरप आणि बीन्स असतात. या पदार्थाची चव वेगळी आणि खास लागते. हा पदार्थ मलेशियन संस्कृतीत प्रसिद्ध आहे.
-
सेंडोल नावाचा मलेशियन पदार्थही मलेशियात प्रसिद्ध आहे. तांदळाच्या पीठाची जेली तयार केली जाते. नारळाचं दूध आणि साखरेचा पाक या पासून हा खास पदार्थ तयार करतात. विशेष म्हणजे हा गारेगार खायचा असतो. हा खाताना अनेकांना आईसक्रीमची आठवणही येते.
-
जपानमध्ये काकिगोरी हे मिष्टान्न प्रसिद्ध आहे. यामध्ये कंडेन्स्ड मिल्क असते. तसंच बर्फ असतो, लाल बीन्सही वापरले जातात. उन्हाळ्यात हा पदार्थ जपानी लोक चवीने खातात
-
फिनलंमधला गोड पदार्थ म्हणजे मम्मी पीठ, गूळ आणि संत्र्यांच्या सालीचं मिश्रण यात असतं. इस्टरला हा खास गोड पदार्थ आवर्जून तयार करतात. यात क्रीमही वापरलं जातं. चव थोडी कडू गोड असते.
-
स्पॅगेटी हा जर्मनीत खाल्ला जाणारा पदार्थही फेमस आहे. त्यात व्हॅनिला आईस्क्रीम, नूडल्स आणि स्ट्रॉबेरी सॉस वापरला जातो. हा पदार्थही लोकांना खूप आवडतो.
-
तुर्कीमध्ये चिकन ब्रेस्ट, दूध, साखर आणि तांदूळाचं पीठ यांचं योग्य मिश्रण करुन तावूक गोग्सु हा पदार्थ तयार केला जातो. हा चवीला पुडिंगसारखा लागतो. हा पदार्थही लोक मिष्टान्न म्हणून खातात.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…