-
पचनाशी संबंधित तक्रारी ओट्समध्ये असलेले सॉल्युबल फायबर (बीटा-ग्लुकान) पचनासाठी उपयुक्त असेल तरी काहींना गॅस, पोटफुगी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांच्या आहारात फायबरचे प्रमाण कमी असते, त्यांच्यात ही समस्या जास्त दिसते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ग्लूटेनची शक्यता ओट्स नैसर्गिकरीत्या ग्लूटन-फ्री असते; पण प्रक्रियेदरम्यान गहू किंवा बार्लीसोबत मिसळल्यामुळे ग्लूटनचे अंश राहू शकतात. त्यामुळे सीलिएक रोग किंवा ग्लूटन-संवेदनशील लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्टिफाइड ग्लूटन-फ्री ओट्सच वापरावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
खनिजशोषणात अडथळा ओट्समध्ये असलेले फायटेट्स (phytates) आयर्न, झिंक व कॅल्शियमसारख्या महत्त्वाच्या खनिजांना बांधून ठेवतात, ज्यामुळे शरीर त्यांचे शोषण नीट करू शकत नाही. दीर्घकाळ ओट्सचे अति सेवन केल्यास खनिजांची कमतरता होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ॲलर्जीक प्रतिक्रिया काही लोकांना ओट्समधील अव्हेनिन नावाच्या प्रोटीनमुळे ॲलर्जी होऊ शकते. त्वचेवर पुरळ, खाज, श्वसनाचा त्रास किंवा पचनातील अस्वस्थता, अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
रक्तशर्करेवर परिणाम इन्स्टंट किंवा फ्लेवर्ड ओट्समध्ये जास्त साखर आणि उच्च ग्लायसेमिक लोड असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी स्टील-कट किंवा रोल्ड ओट्सचा वापर करावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
जास्त कॅलरीजचा धोका ओट्समध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते; पण त्यात जास्त मध, साखर, ड्रायफ्रूट्स किंवा फ्लेवर्ड दूध घातल्यास कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन वाढणे किंवा रक्तशर्करा वाढण्याचा धोका असतो. साधे टॉपिंग- जसे ताजे फळ, दालचिनी किंवा नट्स वापरावेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ओट्सवर जास्त अवलंबित्व टाळा दररोज ओट्स खाल्ल्याने आहारात एकसुरीपणा येऊ शकतो आणि इतर पौष्टिक अन्नपदार्थांपासून शरीर वंचित राहू शकते. त्यामुळे आहारात विविधता ठेवा– कधी ओट्स, कधी चिया पुडिंग किंवा इतर धान्यांचा समावेश करा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
गुणवत्तेकडे लक्ष द्या कधी कधी ओट्समध्ये जड धातू किंवा मायकोटॉक्सिनचे अंश असू शकतात. कमी दर्जाचे किंवा नॉन-ऑरगॅनिक ओट्सचे दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी विश्वसनीय आणि ऑरगॅनिक ब्रँड निवडा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी