-
जिम करणारे बहुतेक लोक दररोज अंड्याचं सेवन करतात. काहीजण एक किंवा दोनच नव्हे तर त्याहूनही अधिक अंडी खातात. मात्र, कोणत्याही गोष्टीचं जास्त प्रमाण शरीरावर दुष्परिणाम करू शकतं, त्यामुळे जाणून घ्या – एका दिवशी किती अंडी खावी आणि ती खाण्याची योग्य वेळ कोणती आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
अंड्यातील पोषक घटक अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन A, B12, D आणि E चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय आयर्न, फॉस्फरस आणि झिंकसारखी खनिजेही अंड्यात मुबलक प्रमाणात आढळतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
जिम करणारे किती अंडी खाऊ शकतात? जे लोक शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह असतात, त्यांनी दिवसाला २ ते ३ अंडी खाल्ली तरी चालतात. व्यायामामुळे शरीराला प्रोटीनची गरज वाढते आणि अंडं हे त्याचं उत्तम स्रोत आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
उकडलेलं अंडं किती वेळ ठेवावं? उकडलेल्या अंड्याचीही एक ठरलेली वेळ असते. उकडल्यावर २ ते ३ तासांच्या आत ते खाणं योग्य असतं. त्यानंतर अंडं खराब होऊ शकतं आणि त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हृदयाचे रुग्ण अंडी खाऊ शकतात का? हृदयविकार असलेल्या रुग्णांनी अंड्याचा फक्त पांढरा भाग खावा. मात्र, अंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
एका अंड्यात किती कोलेस्ट्रॉल असतं? एका अंड्यात सुमारे १९० मि.ग्रॅ. कोलेस्ट्रॉल असतं. हे प्रामुख्याने अंड्याच्या जर्दीत असतं, त्यामुळे हृदयाच्या रुग्णांना जर्दी टाळण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
अंडी खाण्याची योग्य वेळ अंडी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणानंतर खाणं सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. रात्रीदेखील मर्यादित प्रमाणात अंडी खाल्ली जाऊ शकतात. वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी रात्री अंडी खाणं उपयोगी ठरतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती