-
हृदयविकाराचा झटका नेहमीच छातीत तीव्र वेदनांसह येत नाही, विशेषतः महिलांमध्ये. अनेकांना सौम्य किंवा सहज दुर्लक्षित लक्षणांसह सायलेंट हृदयविकाराचा झटका येतो. महिलांमध्ये सायलेंट हृदयविकाराच्या सहा सुरुवातीच्या लक्षणांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये.
-
असामान्य थकवा: विश्रांती घेतल्यानंतरही, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय खूप थकवा जाणवणे हे सुरूवातीचे धोक्याचे लक्षण असू शकते. हा थकवा अनेकदा हृदयविकाराच्या घटनेच्या काही दिवस किंवा आठवडे आधी दिसून येतो.
-
चक्कर येणे – विशेषत: मळमळ किंवा घाम येणे यासह अचानक चक्कर आल्यास, ते अनियमित हृदयाचे ठोके (irregular heartbeat) किंवा मेंदूपर्यंत कमी ऑक्सिजन पोहोचल्याचे संकेत असू शकते
-
जबडा, मान आणि पाठीत अस्वस्थता: महिलांना छातीपेक्षा जबडा, मान, खांदा किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना होण्याची शक्यता जास्त असते.
-
छातीत सौम्य अस्वस्थता: तीव्र वेदनांऐवजी, महिलांना अनेकदा छातीत दाब किंवा भरल्यासारखे वाटते जो कधीही येऊ आणि जाऊ शकते, हेहृदयाकडे रक्त प्रवाह मर्यादित प्रमाणत होत असल्याचे लक्षण आहे.
-
अपचन किंवा मळमळ: अनेक स्त्रिया हृदयाच्या लक्षणांना पोटाच्या समस्या समजतात. सतत अपचन, दाब किंवा जळजळ होण्याची भावना पचनाशी संबंधित नसून हृदयाशी (cardiac) संबंधित असू शकते.
-
श्वास घेण्यास त्रास: जर तुम्हाला चालणे किंवा पायऱ्या चढणे यासारख्या साध्या कामांमध्ये अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते हृदयात रक्त प्रवाह कमी झाल्याचे संकेत देऊ शकते.
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध