-
शेवगा हे आपल्या शरीरासाठी अमृत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कारण शेवग्यात कॅल्शियम, लोह आणि अ, क तसंच ई जीवन सत्व आहे. शेवगा हा सांबारमध्ये वापरला जातो. शेवग्यामुळे छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसंच या शेवग्यात रोगप्रतिकारक शक्तीही आहे.
-
आवळा हे दुसरं असं सुपरफूड आहे जे व्हिटॅमिन सीच्या स्त्रोतांपैकी एक आहे. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन व्यवस्थित होतं. आवळा केसांच्या वाढीसाठीही उपयोगी आहे. च्यवनप्राशचा मुख्य घटक आवळाच आहे.
-
सोनेरी हळद म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातली हळद ही त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. तसंच दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्याचं काम हळद करते. सांध्यांचं आरोग्य राखण्यासाठीही हळद खूप उपयोगी आहे.
-
नाचणी हे असं एक धान्य आहे ज्यात कॅल्शियम, लोह आणि फायबर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम नाचणी किंवा नागली करते. मधुमेहींसाठी हे एक चांगलं आणि उत्तम धान्य आहे.
-
तूप खाल्लं की चरबी वाढते असा एकेकाळी समज होता. पण तूप हे तुमच्या हाडांसाठी खूपच उपयोगी आहे. आयुर्वेदात तूप अत्यंत सात्विक मानलं गेलं आहे. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी तूप हा आवश्यक घटक आहे. तुपाचं प्रमाणात सेवन करणं हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
-
अश्वगंधा ही एक महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांची पावडर नियमितपणे सेवन केल्यास हार्मोनल संतुलन चांगलं राहतं. तसंच अश्वगंधा पावडरमध्ये रोगप्रतिकारक शक्तीही आहे.
पाठोपाठ संकट? वृश्चिक संक्रांतीमुळे अडचणी वाढल्या; १५ डिसेंबरपर्यंत ‘या’ ३ राशींनी राहा सावधान, ज्योतिषींचा इशारा काय?