-
आहारात पांढऱ्या तांदळाला पर्याय म्हणून बाजरीचं सेवन जर आहारात सुरु केलं तर शरीराला फायबर जास्त प्रमाणात मिळतं. वजन नियंत्रणात आण्यासाठीही बाजरीची भाकरी उपयुक्त आहे.
-
बाजरीचा ग्लायमेक्स इंडेक्स तांदूळाच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते.
-
बाजरीचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बाजरीत जास्त फायबर असल्याने ते आरोग्यासाठी उपयोगी असतं.
-
बाजरीचं नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. रक्तदाब कमी होण्यासही मदत होते.
-
बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. दीर्घकाळ भूक लागत नाही. ज्याचा फायदा वजन नियंत्रणासाठी होतो.
-
तांदूळाच्या तुलनेत बाजरीत लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराची उर्जा वाढण्यास मदत होते.
-
बाजरी ही आरोग्यदायी आहे. बाजरीची भाकरी आणि भाजी हा जेवणाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ