-
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्याचे दिसत आहेत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलकांनी घोषणाबाजी देत गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
-
ठाणे रेल्वे स्थानकात काही आंदोलकांनी रेल रोको केल्याचे पाहायला मिळाले.
-
बुधवारी सकाळपासूनच विविध ठिकाणी आंदोलकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून, भीमा कोरेगाव हिंसाचाराचा विरोध केला आहे. रिक्षा, टॅक्सी आणि मुंबईचे डबेवाले यांनी या बंदला साथ दिल्याचे पाहायला मिळते आहे.
-
संग्रहित छायाचित्र
-
घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी आणि पूर्व द्रुतगती मार्ग येथेही मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा पाहायला मिळत आहेत.
-
आंदोलन शांततेने पार पडावे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठीच पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे.
-

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…