-
भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
सैन्य दिनाचे यंदाचे ७० वे वर्ष आहे. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
-
-
देशाच्या सीमा रेषेचे रक्षण करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सैन्याचे जवान सर्वसामान्यांच्या मदतीला धावतात अशी आठवणही मोदींनी करुन दिली. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
भारतीय जवानांनी केलेल्या त्यागाचे कौतुक करत मोदी म्हणाले, देशातील १२५ कोटी नागरिकांना शांततेत राहता यावे यासाठी सैन्याचे जीव स्वतःचा जीव धोक्यात घालतात. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
युद्धजन्य परिस्थिती नसतानाही हिमालयातील गोठविणाऱ्या थंडीत, थरच्या उष्ण वाळवंटामध्ये आणि ईशान्येकडील दाट जंगल परिसरामध्ये डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
सैन्य दिनानिमित्त सोशल मीडियावरही सैन्याच्या जवानांना सलामी दिली जात आहे. काँग्रेसनेही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जवानांना त्यांच्या कार्यासाठी सलाम केला आहे. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
देशभरात सैन्य दिन साजरा होत असतानाच सीमा रेषेवर सतर्क जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे चारही दहशतवादी ‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
-
भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)
-
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. (छाया सौजन्य- संदीप दौंडकर)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…