मनसे कामगार सेनेतर्फे शेतकरी मोर्चाला आलेले ३० हजार शेतकरी महिला बांधव शनिवारी मुंबईत पोहोचले. यावेळी त्यांना मनसेकडून पाणी आणि खाद्यपदार्थ देण्यात आले. -
मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मनसेने अतिशय चांगले नियोजन केले होते. यासाठी कार्यकर्त्यांची फळी अहोरात्र काम करत होती.
-
अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा १२ मार्चला विधान भवनावर धडकणार आहे.
-
खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था पक्षाने केली होती. तसेच सहभागी बांधवांनीही आपापल्या परिने या कामाला हातभार लावला.
रात्रीच्या वेळी मोर्चेकऱ्यांसाठी अशाप्रकारे अन्न शिजत होते. उन्हातान्हाची तमा न बाळगता राज्यभरातून आलेल्या बळीराजाची काळजी घेतली गेली. या मोर्चाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. -
जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हक्काच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी हिंमत एकवटली असून मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी काही काळासाठी विसावा घेतला.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली