संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेली थायलंडमधली बचाव मोहिम अखेर यशस्वी ठरली आहे. या मोहिमेतील आतापर्यंत न पाहिलेली काही क्षणचित्रं समोर आली आहेत. (छायासौजन्य : AP) चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन २३ जून पासून वाईल्ड बोअर टीमचे १२ खेळाडू आणि त्यांचा १ शिकाऊ प्रशिक्षक अडकला होता. (छायासौजन्य : AP) थाय अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी बचाव मोहिमेला सुरूवात झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. ८ जुलैला या प्रत्यक्ष बचाव मोहिमेला सुरूवात झाली. (छायासौजन्य : AP) १३ विदेशी पाणबुडे आणि थायलंड नौदलाच्या ५ कमांडोच्या टीमनं या मुलांना तीन गट करून बाहेर काढलं. (छायासौजन्य : AP) जवळपास १३ देशांतील १ हजारांहून अधिक तज्ज्ञ या मोहिमेत सहभागी झाले होते. तीन आठवड्यांपासून या मुलांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी कमांडो आणि पाणबुडे प्रयत्नांची शिकस्त करत होते. (छायासौजन्य : AP) गुहेतील पाण्याची पातळी वाढू नये यासाठी दर मिनिटांला हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात होता. (छायासौजन्य : AP) अखेर या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून या मुलांना सध्या स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. (छायासौजन्य : AP)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा