-
तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. (छायासौजन्य – AP)
-
निधनाचे वृत्त समजताच करुणानिधी यांच्या चाहत्यांनी एकच आक्रोश केला. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. (छायासौजन्य – AP)
-
११ दिवसांपासून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दोन दिवसांपासून जास्तच खालावली होती, त्यामुळे त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. (छायासौजन्य – AP)
-
तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतरही जनतेला अपार दु:ख झाले होते. त्यानंतर आता करुणानिधी यांच्या निधनानंतरही हीच अवस्था आहे. (छायासौजन्य – AP)
-
६० वर्षाच्या राजकीय करीयरमध्ये करुणानिधी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. सर्वाधिक १३ वेळा आमदार बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. (छायासौजन्य – ANI)
-
त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (छायासौजन्य – ANI)

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! व्हॉट्सअॅपवर शेअर करा सुंदर HD PHOTOS