-
राजस्थानात सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत सरकारला झटका देण्याची तयारी केली होती. पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही.
-
उलट गेहलोत यांनीच सचिन पायलट यांच्या गोटातील चार आमदारांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले. यात महत्त्वाची भूमिका बजावली ती, अशोक गेहलोत यांचे जुने सहकारी प्रद्युमन सिंह यांनी. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
-
प्रद्युमन सिंह यांचा मुलगा रोहित बोहरा सुद्धा पायलट यांच्यासोबत होता. दानिशष अबरार, प्रशांत बैरवा आणि चेतन दुदी यांच्यासोबत रोहित बोहरा शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. हे चारही पायलट यांचे निष्ठावान समजले जातात.
-
तीन वेळ आमदार राहिलेल्या प्रद्युमन सिंह यांच्यामुळे पायलट गोटातील चार आमदार पुन्हा काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले.
-
शनिवारी संध्याकाळी गेहलोत रोहित बोहरा यांच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर बोहरा यांच्यामार्फत अन्य तीन आमदारांसोबत चर्चा केली.
-
सचिन पायलट यांच्यासोबत तुम्हाला काहीही भविष्य नाहीय हे गेहलोत यांनी त्या चार आमदारांना पटवून दिले. या चारही आमदारांच्या सर्व तक्रारी दूर करण्याचे आणि त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याचे गेहलोत यांनी शब्द दिला.
-
राजस्थान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. या फोन कॉलनंतर ते चारही आमदार दिल्लीमधून निघाले व रविवारी दुपारी चार वाजता जयपूरमध्ये पोहोचले.
-
तिथे त्यांची गेहलोत यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक झाली. या चार आमदारांपैकी एकाने माफी सुद्धा मागितली असे दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. हा पदाधिकारी आमदार गेहलोत यांच्या घरी आले, त्यावेळी तिथे उपस्थित होता.
-
"या चार आमदारांना परत आणून गेहलोत यांनी पायलट यांच्या गटात फूट पाडली व दिल्लीच्या वरिष्ठ नेतृत्वाला आणखी बंडखोर आमदार माघारी फिरतील हे पटवून दिले" असे असे काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.
-
सचिन पायलट यांच्यासोबत गेलेल्या या चारही आमदारांनी रविवारी पत्रकार परिषद करुन गेहलोत यांच्यासोबत असल्याचे सांगितले. 'आम्ही अनेक पिढयांपासून काँग्रेसचे सैनिक असून पक्षासोबत राहणार' असे अबरार यांनी सांगितले.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग