-
आसाममधील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राणी तस्करांकडून चक्क एक कांगारु जप्त केला आहे. कांगारुबरोबरच सहा मस्कोज पक्षी, तीन दुर्मिळ कासवं आणि दोन माकडं वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतली आहे. ही कारवाई आसाम-मिझोरमच्या सीमेजवळ करण्यात आली आहे. (Photo: ANI)
-
वन खात्याच्या काछर उपविभागाच्या अधिकाऱ्यांना संक्षय आल्याने त्यांनी सीलचार जिल्ह्यामध्ये एका ट्रकची तपासणी केली. मिझोरमवरुन येणाऱ्या या ट्रकची लैलापूर सब बिटच्या कर्मचाऱ्यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. (Photo : Twitter/kushaldebroy)
-
या ट्रकमध्ये अधिकाऱ्यांना दुर्मिळ प्राणी आढळून आले. पोलिसांनी या ट्रकमधील नरसिंम्हा रेड्डी आणि नवनात धायगुडे या दोघांची चौकशी केली असता हे प्राणी गुवहाटीला नेले जात असल्याची माहिती समोर आली. (Photo : Twitter/cacharpolice)
-
स्थानिक वन अधिकारी असणाऱ्या सनीदेव चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन खात्याकडून सामान्यपणे करण्यात येणाऱ्या तपासणीदरम्यान हे प्राणी आढळून आले.
-
ट्रकच्या मागच्या बाजूच्या भागामधून विचित्र वास येत असल्याने अधिकाऱ्यांना संक्षय आला. सुरुवातील खराब झालेली फळं असल्याचं कार ट्रकमधील व्यक्तींनी दिलं. मात्र तपासीण केली असता ट्रकमध्ये प्राणी आढळून आले.
-
ऑस्ट्रेलियातून तस्करी करुन आणलेला कांगारु, सहा मॅकाओ पक्षी, दक्षिण अमेरिकेत सापडणारी दोन कॅप्युचीन प्रजातीची माकडे, अल्दाबार प्रजातीची तीन मोठी कासवं अधिकाऱ्यांना या ट्रकमध्ये सापडल्याचे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. (Photo: ANI)
-
अटक करण्यात आलेल्यांनी, त्यांना हा ट्रक मिझोरममध्ये ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले. हा ट्रक गुवहाटीमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आमच्यावर होती असंही अटक करण्यात आलेल्या दोघांनी सांगितले. (Photo : Twitter/assampolice)
-
या सर्व प्राण्यांना गुवहाटी येथील प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आलं आहे. या प्राण्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. हे परदेशातील दुर्मिळ प्राणी भारतात कसे आले यासंदर्भात पोलीस आता तपास करत आहेत.(Photo : Twitter/kushaldebroy)
-
प्राणी तस्करीची प्रकरण उघडकीस आल्यावर लहान आकाराचे प्राणी, पक्षी सापडणे ही समान्य गोष्ट आहे. मात्र थेट कांगारुचीही तस्करी केली जात असल्याने अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला.(Photo : Twitter/cacharpolice)
-
सोशल नेटवर्किंगवरही कांगारु आणि अमेरिकेत सापडणारी माकडं या लोकांनी भारतात आणलीच कशी असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Photo : Twitter/cacharpolice)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”