-
रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या अटकेची कारवाई करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे होती ते अधिकारी आहेत सचिन वाझे. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही कारवाई करण्यात आली.
-
सचिन वाझे हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावावर ६३ एन्काऊंटर आहेत. सचिन वाझे तब्बल १३ वर्षांनी जून २०२० मध्ये पोलीस दलात परते आहेत.
-
सचिन वाझे यांनी १९९० मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलीस दलात नोकरी सुरु केली
-
सचिन वाझे यांनी आत्तापर्यंत दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्या अनेक हस्तकांना एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे त्यांचे वरिष्ठ होते.
-
सचिन वाझे यांच्यासहीत १४ अधिकाऱ्यांना २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. ख्वाजा युनुसच्या कोठडीत झालेल्या मृत्यूचा ठपका या सगळ्यांवर ठेवण्यात आला होता.
-
निलंबन मागे न घेतलं गेल्याने २००७ मध्ये त्यांनी पोलीस दलातून राजीनामाही दिला होता.
-
२०२० मध्ये सचिन वाझे हे करोना संकटाच्या काळात पुन्हा एकदा पोलीस दलात दाखल झाले
-
'मिशन अर्णब'ची जबाबदारी सचिन वाझे यांच्यावर देण्यात आली होती
-
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटकेनंतर सचिन वाझे हे नाव पुन्हा चर्चेत आलं

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा