-
शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणारं पुणे बुधवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं.
-
पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण सोसायटीच्या आवारात चक्क गवा फिरत होता. (Express Photo: Ashish Kale)
-
सोसायटीत गवा शिरल्याचा माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला होता. प्रामुख्याने जंगलांमध्ये आढळून येणारा हा प्राणी लोकवस्तीमध्ये दिसून आल्याने गोंधळ उडाला. (Express Photo: Ashish Kale)
-
गव्याला पाहण्यासाठी पुणेकरांनीही चांगलीच गर्दी केली होती. (Express Photo: Ashish Kale)
-
मानवी वस्तीत आलेल्या या जंगली प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यात आला. (Express Photo: Ashish Kale)
-
सकाळी साडेअकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. (Express Photo: Ashish Kale)
-
तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला. (Express Photo: Ashish Kale)
-
लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची या गव्याला पकडताना चांगलीच दमछाक झाली. (Express Photo: Ashish Kale)
-
वन अधिकारी या गव्याचा पाठलाग करत असतानाच तो पौड रोड वरील मुख्य रस्त्यावर पोहचला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. (Express Photo: Ashish Kale)
-
दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले आहे. तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं. (Express Photo: Ashish Kale)
-
गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं.

शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज