-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या साताऱ्यातील वादळी सभेचं रेखाचित्र पुण्यात भिंतीवर रेखाटण्यात आलं आहे.
-
वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून नारायण पेठ येथे हे चित्र रेखाटलं आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात उद्घाटन करण्यात आले.
-
"वाऱ्यासोबत उडून चाललेल्या पालापाचोळ्याची फिकीर नको, इथे नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष आहे," असं या फोटोखाली लिहिण्यात आलं आहे.
-
यावेळी पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेना पक्ष प्रमुख संजय मोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
-
१९ ऑक्टोबर २०१९ ला साताऱ्यात शरद पवारांची सभा सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला होता. मात्र शरद पवारांनी न थांबवता पावसात भाषण केलं होतं.
-
शरद पवार साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते.
-
शरद पवारांच्या या सभेमुळे उदयनराजे यांचा पराभव झाला आणि श्रीनिवास पाटील निवडून आले होते.
-
वयाच्या ७९ व्या वर्षी शरद पवारांना दाखवलेल्या उत्साहाचं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने कौतुक केलं होतं.
-
त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Devendra Fadnavis: “ते जिंकले, हरले किंवा…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचे कौतुक