-
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' चांगलाच चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडं मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना मदत करण्यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
-
त्यानंतरही 'बाबा का ढाबा'संदर्भात नंतर बराच वाद झाला. मात्र आता हा बाबा का ढाबा आणि कांता प्रसाद पुन्हा चर्चेत आले ते त्यांनी सुरु केलेल्या नवीन रेस्तराँमुळे.
-
कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी यांनी मालविया नगरमध्ये 'बाबा का ढाबा' नावानेच नवीन रेस्तराँ सुरु केलं आहे.
-
एएनआय या वृत्तसंस्थेने कांता प्रसाद यांच्या या नव्या रेस्तराँचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये रेस्तराँचे भन्नाट इंटिरियर दिसून येत आहे. भिंतींवर मोरपिसांच्या आकाराचे नक्षीकाम करण्यात आलं आहे.
-
कांता प्रसाद यांनी यावेळी एएनआयशी संवाद साधला. "आम्ही खूप आनंदी आहोत. देव आमच्यावर प्रसन्न झालाय. ज्या लोकांनी आम्हाला मदत केली मी त्यांचे आभार मानतो. माझ्या या रेस्तराँला त्यांनी नक्की भेट द्यावी असं मी आवाहन करतो," असं कांता प्रसाद यांनी म्हटलं आहे.
-
आपल्या या नवीन रेस्तराँमध्ये भारतीय जेवणाबरोबरच चायनिज पदार्थही उपलब्ध असतील असंही कांताप्रसाद यांनी सांगितलं आहे.
-
रेस्तराँमध्ये छान रोषणाई करण्यात आली आहे. रेस्तराँ सुरु करण्यात आलं त्या दिवशीच येथे बरीच गर्दी झाल्याचं पहायला मिळालं.
-
आधी केवळ आपल्या पत्नीच्या मदतीने ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांनी आपल्या रेस्तराँमध्ये कामासाठी काही कर्मचारीही ठेवले आहेत.
-
'बाबा का ढाबा' याच नावाने सुरु करण्यात आलेल्या रेस्तराँमध्ये कांता प्रसाद आता गल्ल्यावर बसून आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याचं काम करतील असं चित्र दिसत आहे. या नव्या रेस्तराँबाहेर तसेच आतमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत.
-
युट्यूबवर गौरव वासन याने बाबा का ढाबा चालवणाऱ्या या जोडप्याचा व्हिडीओ शूट केला होता, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले. पण काही दिवसांनी या प्रकऱणाला एक वेगळं वळण मिळालं.
-
गौरववर आर्थिक मदत चोरल्याचा आऱोप करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मदत केली त्याच कांता प्रसाद यांनी गौरववर आरोप केला असून आपल्याला आलेली मदत दिली नसल्याचं म्हटलं. कांता प्रसाद यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली असून गौरवविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (सर्व फोटो : एएनआय आणि ट्विटवरुन साभार)

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”