-
अंटार्क्टिकामधील सर्वात मोठा हिमखंड म्हणजेच आईसबर्ग समुद्रामध्ये जमीनीच्या दिशेने वाहू लागला आहे. ए ६८ नावाच्या या हिमखंडाचा आकार ५,८०० वर्ग किलोमीटर इतका मोठा आहे.
-
अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास हा हिमखंड मुंबई शहराच्या दहापटीहून अधिक मोठ्या आकाराचा आहे.
-
हा हिमखंड सध्या दक्षिण जॉर्जियाच्या दिशेने सरकत असून या हिमखंडासंदर्भात तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. याच वेगाने हा हिमखंड वाहत राहिल्यास तो धोकादायक ठरु शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
-
मुंबईच्या दसपटीने मोठा हिमखंड अंटार्क्टिका पासून २०१८ साली जुलै महिन्यामध्ये वेगळा झाला. या हिमखंडाच्या या भल्या मोठ्या आकारामुळे त्याचा जागतिक पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
-
एवढ्या मोठ्या आकाराचे हिमखंड तुटतात किंवा एका जागेवरुन दुसरीकडे स्थलांतर करु लागतात तेव्हा तो पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असतो.
-
बर्फ मुख्य जमीनीपासून वेगळा होऊन सुमद्रात वाहत जाणे ही सामान्य गोष्टी आहे. मात्र एवढ्या मोठ्या आकाराचा हिमखंड वेगळा होणं हे जैवविविधता आणि समुद्रातील पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त हानीकारक असल्याचे सांगितले जाते.
-
एकीकडे असा मतप्रवाह असला तरी ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेच्या माहितीनुसार ही एक नैसर्गिक घटना असून याचा वातावरणातील बदलांशी काही संबंध नाही असंही सांगितलं जात आहे. मात्र अनेक अभ्यासांमधून अशाप्रकारे हिमखंड किंवा हिमकडे विरघळण्याचा थेट संबंध वातावरणातील बदलांशी असल्याचे स्पष्ट झालं आहे.
-
आता हा हिमखंड तरंगणाऱ्या एका मोठ्या बेटाप्रमाणे समुद्रामधून प्रवास करत आहे.
-
हा हिमखंड एखाद्या ठिकाणी अडकून राहिल्यास तेथील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होऊन काही वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-
या हिमखंडामुळे पेंग्विन आणि सीलसारख्या प्राण्यांना अन्न शोधणं, समुद्रामधून प्रवास करणं यासरख्या गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.
-
हिमखंडामुळे प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असून लहान प्राणी आपल्या समुहापासून दुरवण्याची आणि त्यामध्येच दगावण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
-
ए ६८ मुळे जगभरातील समुद्राच्या पाण्याची पातळी दहा सेंटीमीटरने वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
-
या हिमखंडामुळे समुद्रामधून प्रवास करणाऱ्या जहाजांनाही अचडणींचा समाना करावा लागू शकतो.
-
अनेकदा हिमखंडाच्या आकाराचा अंदाज न आल्याने जहाजांचे अपघात होऊन त्यांना जलसमाधी मिळाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
-
अनेकदा असे हिमखंड हे समुद्रावर तरंगताना दिसत असले तरी त्यांचा बेस म्हणजे पाण्याखालील आकार हा खूपच जास्त मोठा असण्याची शक्यता असते. त्यावरुन हिमनगाचे टोक हा वाक्यप्रचार जन्माला आल्याचे सांगितले जाते.
-
हा हिमखंड तुटल्याचे परिणाम भारतावरही होणार आहे. अंदमान-निकोबार बेट समुहांमधील अनेक बेटांना याचा फटका बसण्याची शक्यात असून हा बेटांचा बराचसा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंगलाच्या खाडीमधील सुंदरबन प्रदेशातील बराचसा भाग पाण्याखाली जाऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे.
-
अर्थात ही प्रक्रिया हळूहळू होईल मात्र हा एवढ्या मोठ्या आकाराचा हिमखंड वितळल्यास त्याचे परिणाम जगातील सर्वच देशांना भोगावे लागतील हे स्पष्ट आहे. सुमारे ९८ टक्के बर्फाच्छादित असलेल्या अंटार्क्टिका पासून हिमखडा तुटून पडणे ही काही नवी बाब नाही. मात्र, ५,८०० वर्ग किलोमीटरचा ए ६८ हा हिमखंड २०१८ साली १० जुलै ते १२ जुलैदरम्यान अंटार्क्टिका पासून तुटला. या भल्यामोठय़ा हिमखंडामुळे सागरी वाहतुकीला धोका निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांनी दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. हा हिमखंड लंडनच्या चौपट आणि मुंबईच्या ९.६१ पट आहे.
-
हा हिमखंड अंटार्क्टिका पासून तुटत असल्याचे नासाच्या ‘अॅक्वा मोडीस’ उपग्रहाने टिपले होते. तसेच युरोपीय अवकाश संस्थेच्या सेंटीनेल-१ उपग्रहद्वारे हा हिमखंड तुटत असल्याचे निरिक्षण वर्षभरापासून नोंदविण्यात येत होते.
-
‘हा मोठा हिमखंड तुटेल याकडे आमचे गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागले होते. अखेर तो तुटला. पण हिमखंड तुटण्यास बराच काळ लागल्याचे आश्चर्य वाटले’, असे ब्रिटनच्या स्वानसी विद्यापीठातील प्राध्यापक आंद्रियन लकमन यांनी हा हिमखंड तुटला तेव्हा सांगितलं होतं. (फोटो प्रतिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : एपी, एफपी, रॉयटर्स आणि पीटीआय)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो