-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेतून भाजपाने मुंबईमध्ये दादर येथे आत्मनिर्भर टी स्टॉल सुरु केले आहेत.
-
बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं.
-
आत्मनिर्भर भारत खऱ्या अर्थाने प्रगत करत असल्याचं सांगत महाराष्ट्र भाजपाने या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
-
तर फडणवीस यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन आत्मनिर्भर चहा असं म्हणत या उद्घाटन सोहळ्याचे फोटो शेअर केले.
-
या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आत्मनिर्भर चहाचा आस्वादही घेतला.
-
-
आत्मनिर्भर भारत ही केवळ एक प्रेरणादायी घोषणा नाही तर मोदीजींसह देशाच्या युवकांद्वारे करण्यात आलेला संकल्प आहे. आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आत्मनिर्भर टी स्टॉलचे उद्घाटन केले, अशा कॅप्शनसहीत चंद्रकांत पाटील यांनीही या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले.
-
मला विश्वास आहे की, महाराष्ट्राचा प्रत्येक युवक आत्मनिर्भर होईल आणि आपल्या देशाला सशक्त करण्यामध्ये आपले सकारात्मक योगदान देईल, असंही चंद्रकांत पाटील हे फोटो शेअर करताना म्हणाले आहेत.
-
मात्र भाजपाच्या या आत्मनिर्भर चहावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन टीका केली होती. आत्मनिर्भर चाय बनाने के लिए गटर गैस कहां है?, असं ट्विट सावंत यांनी महाराष्ट्र भाजपाला टॅग करुन केलं होतं.
-
“दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजागार देण्याचं वचन देऊन नरेंद्र मोदी सत्तेवर आले होते. आतापर्यंत सहा वर्षांमध्ये १२ कोटी रोजागार त्यांनी दिले पाहिजे होते. परंतु, त्या ऐवजी १२ कोटी रोजागर होते ते देखील निष्ट झालेले आहेत. बेरोजगाराची एक प्रचंड फौज त्यांनी निर्माण केलेली आहे. आता बेरोजगारीचा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही, रोजगार तर देता आलेला नाही. परंतु, नवनवीन योजना ते नक्कीच देतात. त्यातीलच एक अतिदुरदृष्टीनं प्रेरीत झालेली, महत्वकांक्षेने भारीत झालेली योजना होती “आत्मनिर्भर पकौडा” योजना त्याच्या अभूतपूर्व अपयशानंतर आता मुंबई भाजपा तर्फे आता मोदीजींच्या संकल्पनेने एक नवी योजना लागू होत आहे, त्याचं नाव आहे आत्मनिर्भर टी स्टॉल” अशी टीका सचिन सावंत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओतून केलीय.

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी