-
देशात करोना व्हायरसच्या लसीकरणाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या १६ जानेवारीपासून देशात सर्वसामान्य नागरिकांना लसी डोस देण्यास सुरुवात होईल.
-
लसीकरणाआधी संपूर्ण देशात ड्राय रन सुद्धा घेण्यात आला आहे. जेणेकरुन कुठे काही चूक होऊ नये.
-
आज पहाटेपासूनच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पातून 'कोव्हिशिल्ड' लसीचे डोस देशातील वेगवेगळया राज्यात पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
-
अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या लसी पाठवण्यात आल्या आहेत.
-
सरकारने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला लस खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे.
-
ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लसीची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे पहिले १० कोटी डोस भारत सरकारला एका विशेष किंमतीला विकण्याचा निर्णय घेतला आहे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदर पूनावाला यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
-
या १० कोटी करोना प्रतिबंधक लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २०० रुपये असणार आहे. खासगी बाजारात सीरम हीच लस १ हजार रुपयांना विकणार आहे.
-
करोना लसी नेमकी कशी असेल? किती डोस घ्यावे लागतील? दोन डोस मध्ये किती दिवसाचे अंतर असेल? लस कधीपासून प्रभावी ठरेल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील.
-
या सर्व प्रश्नांसंदर्भात भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल. म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल.
-
-
दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी लसीची परिणामकारकता दिसायला लागेल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
-
त्यामुळे लस घेतली म्हणून लगेच बेसावध होऊन चालणार नाही. करोनाला रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करावे लागेल.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…