-
जगभर हाहाकार माजविलेल्या करोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) १३ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक गुरुवारी वुहानमध्ये दाखल झाले. मात्र या पथकाला चीनने क्वारंटाइन केलं आहे.
-
१४ दिवसांनंतरच या पथकाला सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. १४ दिवस या पथकातील १३ सदस्य आयसोलेशनमध्ये राहणार असून त्यांच्यावर चिनी अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. या क्वारंटाइनसंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेनेच दिली आहे.
-
जागतिक आरोग्य संघटनेच्या १३ तज्ज्ञांचे पथक आज चीनमध्ये पोहचलं आहे. करोना विषाणूच्या उत्पत्तीचे मूळ कुठे आहे यासंदर्भात संशोधन करण्यासाठी हे पथक वुहानला पोहचले आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटवरुन दिली.
-
मात्र या पथकातील सर्व तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असणाऱ्या नियमांप्रमाणे दोन आठवडे क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्येही हे तज्ज्ञ संशोधनासंदर्भातील काम करतील असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
-
क्वारंटाइनमध्ये असताना हे तज्ज्ञ करोना परिस्थितीसंदर्भातील अभ्यास करणार असल्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं आहेत.
-
१५ जणांचे पथक या तपासासाठी चीनमध्ये दाखल होणार होतं. मात्र दोन तज्ज्ञांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सिंगापूर येथून थेट वुहानला आलेल्या विमानामध्ये बसू देण्यात आले नाही.
-
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असलेले निर्बंध पाळल्यानंतर पथक त्वरित ऑन फिल्ड चौकशीला सुरुवात करणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
-
पथकातील अन्य दोन तज्ज्ञ अद्यापही सिंगापूरमध्येच असून त्यांची चाचणी केली जात आहे. प्रवासापूर्वी या तज्ज्ञांची त्यांच्या मायदेशात चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर सिंगापूरमध्ये चाचणी करण्यात आली तेव्हा दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
-
सिंगापूरमध्ये ज्या तज्ज्ञांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांची पुन्हा आयजीएम आणि आयजीजी प्रतिपिंड चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना चीनला पाठविण्यात आलेले नाही, असे वृत्त द वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.
-
हे पथक संशोधन संस्था, रुग्णालये आणि मासे विक्री करण्यात येणाऱ्या बाजारपेठेतील लोकांशी चर्चा करणार आहे.
-
वुहानमधील बाजारपेठेतून करोनाचा सर्वप्रथम फैलाव झाल्याचे सांगण्यात येत असल्याने या ठिकाणी हे पथक भेट देणार आहे. एका विशेष बसने या पथकाला हॉटेलवर नेण्यात आलं.
-
जागतिक आरोग्य संघटनेच्या या पथकामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, रशिया, द नेदरलॅण्ड्स कतार आणि व्हिएतनाम येथील तज्ज्ञ आहेत. (फोटो रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या