-
भारताबरोबरच अनेक देशांमध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या करोना लसीकरणाचे वेगवेगळे टप्पे सुरु आहेत. जगभरामध्ये सुरु असणाऱ्या करोना लसीकरणामध्ये काही गोष्टींमध्ये साधर्म्य दिसून येत आहे.
-
आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोनायोद्ध्यांनंतर वयस्कर व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना करोनाची लस देण्यास अनेक देश प्राधान्य देत आहेत. असं असतानाच करोनाचा उद्रेक ज्या ठिकाणाहून झाला त्या वुहानमधील संशोधकांनी या लसीकरणाच्या पद्धतीवर शंका उपस्थित केलीय.
-
असं असतानाच करोनाचा उद्रेक ज्या ठिकाणाहून झाला त्या वुहानमधील संशोधकांनी या लसीकरणाच्या पद्धतीवर शंका उपस्थित केलीय.
-
लसीकरणामध्ये आधी लहान मुलांना करोनाची लस देण्यात यावी असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी एक खास कारणही त्यांनी सांगितलं आहे.
-
'द लँसेट'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लहान मुलांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग अधिक वेगाने होतो असं स्पष्ट झालं आहे.
-
या अभ्यासामध्ये २० हजारांहून अधिक कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.
-
वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रव्हेंशन म्हणजे सीडीसीकडून या अभ्यासाला दुजोरा देण्यात आलाय. करोनाची लक्षणं आणि असिम्प्टोमॅटिक लोकांना या अभ्यासामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं होतं.
-
एखाद्या घरामध्ये करोनाचा विषाणू कोणत्या वयोगटातील व्यक्तींच्या माध्यमातून अधिक वेगाने पसरु शकतो हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.
-
या संशोधनामध्ये समोर आलेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी मुलांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असला तरी लहान मुलांच्या माध्यमातून वयस्कर लोकांपेक्षा अधिक वेगाने करोनाचा फैलाव होतो, असा दावा करण्यात आलाय.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
मुलांच्या माध्यमातून करोनाचा प्रसार वेगाने होईल अशी भीती असल्याने शाळा पुन्हा सुरु कराव्यात की नाही यासंदर्भातही तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असून अनेकांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केलीय.
-
या संशोधनादरम्यान प्री सिम्प्टोमॅटिक रुग्णांच्या माध्यमातून करोनाचा अधिक वेगाने फैलाव होत असल्याचेही स्पष्ट झालं आहे. तसेच लक्षणं दिसत असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत लक्षणं न दिसणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून करोनाचा कमी प्रमाणात संसर्ग होतो असंही या अभ्यासात दिसून आलं.
-
एखाद्या व्यक्तीला करोनाच्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करताना त्याच्या माध्यमातून होणारा संसर्गाचा धोका वाढतो असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
-
या अभ्यासानुसार लहान मुलांनाही इतरांप्रमाणे करोनाच्या लक्षणांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
मात्र यामुळे त्यांना वयस्कर व्यक्तींमध्ये इतर त्रास होण्याचा धोका कमी असल्याचेही संशोधकांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : रॉयटर्स)

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…