-
करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरु झाली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. (सर्व फोटो – संग्रहित)
-
१ फेब्रुवारीपासून वेळेचं बंधन ठेवत सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आली खरं, मात्र काही दिवसांतच करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
-
मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी करोना रुग्ण वाढण्यासाठी कारणीभूत असल्याचे दावे करण्यात आले असून पुढील आठवड्यात लोकल सेवेसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
-
लोकल सेवा सुरु करण्यात आली तेव्हा दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता २१ किंवा २२ फेब्रुवारीला आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
सुरेश काकाणी यांनी यासंबंधी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईत सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर निरीक्षणासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होती. त्यानुसार २१ किंवा २२ फेब्रुवारीला आम्ही आढावा घेणार आहोत. त्यानंतर सामान्यांच्या लोकलप्रवासाबाबत पुढची पावले टाकण्यात येतील".
-
"लोकलने मुंबईच्या बाहेरील प्रवासीदेखील मोठ्या संख्येने प्रवास करत असल्याने तेथील पालिकांचाही विचार करावा लागेल. त्यातून जे मुद्दे समोर येतील ते राज्य शासनापुढे ठेवले जातील," असेही काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.
-
रुग्णवाढीमागे लोकल हे एकमेव कारण नसून हवाई वाहतूक वाढली आहे. देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली असून या गोष्टींचाही विचार करावा लागेल असं काकाणी यांनी सांगितलं आहे.
-
मुंबईत सोमवारी ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. करोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्के झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा लॉकडाउनचं संकट घोंघावू लागलं आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य आहे.
-
राज्यात करोना संकट वाढत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं सांगत सूचक इशारा दिला आहे.
-
"राज्यातील करोनाची रुग्णसंख्या वाढत असून, मुखपट्टी वापरण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. अशीच स्थिती राहिली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कठोर निर्णय घ्यावे लागतील," असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. एका शासकीय बैठकीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
-
(संग्रहित छायाचित्र)

Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…