-
अतिवृष्टीनं तळीये गावात होत्याचं नव्हतं करून टाकलं.
-
पावसाने धो-धो कोसळायला सुरूवात केली अन् दरडीच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या काळाने संधी साधली.
-
३५ घरं असलेल्या तळीये गावात मृत्यूनं अक्षरशः तांडव घातलं.
-
बाळसं धरणाऱ्या चिमुकल्या जिवांपासून ते त्यांना खेळवण्यासाठी आसुरलेल्या वृद्धांवर काळाने झडप घातली.
-
दगड मातीच्या ढिगाऱ्याने तळीयेतील अनेक जिवांचा घास घेतला.
-
अचानक कोसळलेल्या संकटानं तळीये गावाचे हुंदके अजूनही थांबलेले नाहीत, पण डोळ्यातील आसवं थिजली आहेत.
-
शोध मोहिमेदरम्यान मातीतून काढले जाणारे मृतदेह आणि त्यांची होत असलेली विटंबना पाहून ग्रामस्थांचं काळीज हेलावलं आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली गाडलेल्या जिवलगांच्या परतीची आशाही सोडली.
-
हुंदके आवरत ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवणी केली आणि प्रशासनानं ३१ बेपत्तांना मृत घोषित करत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला.
-
तळीये इथं आत्तापर्यंत ५३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती.
-
(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा, आता म्हणे “भारत-पाकिस्तान एकमेकांवर…”