-
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब महागड्या छंदांसाठी नेहमीच ओळखले जाते.
-
मुकेश अंबांनी यांच्या पत्नी निता अंबानींचं राहणीमान हे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारे असते. त्यांचे राहणीमान, कपडे, अलिशान घड्याळं, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्यूम, बॅग्स यांसह इतरही गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
-
एखाद्या पार्टीपासून ते धार्मिक कार्यक्रमापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचा लूक हा वेगळा आणि स्टायलिश असतो. पण तुम्हाला माहितीय का त्यांनी वापरलेल्या किंवा परिधान केलेल्या प्रत्येक गोष्टींची किंमत ही लाखो, करोडोंच्या घरात असते.
-
नीता अंबानी जपानचा सर्वात जुना क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपात चहा पितात. नोरिटेक क्रोकरीच्या संचात 50 कप असतात. विशेष म्हणजे याला सोन्याची बॉर्डर असते. त्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच यातील एका कपाची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे.
-
नीता अंबानी या महागड्या हँड बॅग्सच्या शौकीन आहे. नीता अंबानींच्या कलेक्शनमध्ये हर्मस बर्किन (Hermès Himalaya Birkin)या ब्रँडच्या बॅग्सचा विशेष समावेश आहे. ही बॅग हिरेजडीत असून त्याला २४० हिरे असतात. यात १८ कॅरेट सोने लावले असते. नीता अंबानींच्या पर्सची किंमत ३-४ लाख रुपये आहे.
-
नीता अंबानींना महागड्या हँड बॅग्ससह सँडल्स, बूट घालण्याचीही फार हौस आहे. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी चू, पेलमोड़ा, मार्लिन यांसारख्या अनेक महागड्या ब्रँड्सच्या सँडल्स आहेत. या सर्व सँडल्सची किंमत ही लाखो रुपये आहे.
-
नीता अंबानींना महागडी घड्याळं वापरण्याची खूप आवड आहे. त्या बऱ्याचदा बुल्गारी, कार्टियर, राडो, गुची, केल्विन कॅल्विन आणि फॉसिल सारख्या ब्रॅण्डचे घड्याळे वापरतात.
-
या ब्रँडच्या घड्याळांची किंमत 1.5 ते 2 लाख रुपयांपासून सुरू होते.
-
नीता अंबानी यांना दागिन्यांचीही फार आवड आहे. अनेक कौटुंबिक कार्यक्रमात त्या कोट्यवधी रुपयांचे दागिने परिधान करतात.
-
नीता अंबानी या महागड्या साड्यांच्या शौकीन आहेत. त्यांच्या बहुतांश साड्या या हिरे आणि सोन्याच्या तारीने जडवलेल्या असतात. त्यांनी त्यांच्या मुलाच्या साखरपुड्यादरम्यान नेसलेल्या साडीची किंमत ही 40 लाख रुपये होती.
-
नीता अंबानी या खूप महागड्या लिपस्टिक वापरतात. या लिपस्टिक खास त्यांच्यासाठी बनवल्या जातात. त्यांच्याकडे साधारण ४० लाखांचे लिपस्टिक कलेक्शन आहे.
-
नीता अंबानी यांचे स्वतःचे खासगी विमान देखील आहे. तब्बल 100 कोटींचे हे विमान त्यांना मुकेश अंबानी यांनी 2007 मध्ये भेट दिले होते. या जेट विमानात पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा आहेत.

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”