-
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीवरील कार्यक्रमाच्या अँकर पदाचा राजीनामा दिला आहे.
-
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनियमित वर्तन केल्याबद्दल राज्यसभेतून चतुर्वेदींसह बारा जणांना निलंबीत करण्यात आलं होतं.
-
चतुर्वेदी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना राजीनाम्याचं पत्र लिहिलंय.
-
संसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी पायउतार होत आहे.
-
संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं.
-
“मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दलदेखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे,” असं चतुर्वेदींनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
-
विरोधी पक्षातील १२ खासदारांना ऑगस्टमध्ये झालेल्या मागील अधिवेशनात त्यांच्या अनियमित वर्तनासाठी संसदेच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते.
-
विरोधकांनी हे निलंबन अलोकतांत्रिक आणि वरिष्ठ सभागृहाच्या सर्व प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
-
निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि सीपीआय आणि सीपीआय(एम) मधील प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
-
सर्व खासदार संसदेच्या संकुलातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर दिवसभर निदर्शने करत आहेत. तसेच त्यांचे निलंबन मागे घेईपर्यंत दररोज आंदोलन करत राहण्याचा निर्णय या खासदारांनी घेतला आहे. (फोटो सौजन्य – प्रियंका चतुर्वेदी फेसबुक)

Maharashtra Breaking News Live Updates: मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? – निशिकांत दुबे