-
देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकले जात आहे.
-
पेट्रोल महागडे विकणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे.
-
जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल महागडे विकले जात असले तरी काही देशांमध्ये पेट्रोल नाममात्र दराने विकले जाते.
-
याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्हेनेझुएला. तिथे फक्त २ रुपये लिटर पेट्रोल विकले जाते.
-
महागडे पेट्रोल विकणाऱ्या देशांच्या यादीत भारत १२ व्या क्रमांकावर आहे.
-
जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळते. हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोल १९४ रुपयांना मिळते.
-
यानंतर या यादीत नेदरलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेदरलँडमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १७१ रुपये आहे.
-
त्याचबरोबर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इस्रायलमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १६२ रुपये आहे.
-
अनेक युरोपीय देशांमध्ये पेट्रोलही खूप महाग आहे. युरोपियन देश ग्रीसमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १४९ रुपये आहे. तर ग्रेट ब्रिटनमध्ये १४७ रुपये आहे.
-
पोर्तुगालमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १४४ रुपये आहे, तर जर्मनीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १३६ रुपये आहे.
-
स्पेनमध्येही एक लिटर पेट्रोलसाठी १२६ रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे, भारतात एक लिटर पेट्रोलची सरासरी किंमत सुमारे ९५ रुपये आहे.
-
भारतात गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
-
रविवारी देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये दराने विकले जात आहे.
-
त्याचवेळी आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल १०९.९८ रुपयांना तर एक लिटर डिझेल ९४.१४ रुपयांना मिळत आहे.
-
विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी केला होता.
-
यासोबतच अनेक राज्य सरकारांनी दोन्ही इंधनावरील व्हॅट आणखी कमी केला आहे.
-
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर इंधनाच्या किमती कमी झाल्या होत्या. (सर्व फोटो संग्रहित (लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस)

Indore Couple : शिलाँगला मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशीची हत्याच; शवविच्छेदन अहवालात काय?