-
ऑक्टोबर २०२०नंतर हळुहळू देशातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली. पहिली लाट ओसरत असतानाच अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आणि भारतात मार्च २०२१मध्ये करोनाची दुसरी लाट आली.
-
दुसरी लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दर दिवसाला चार लाखांपर्यंत करोनाबाधित आढळले. तर, मृतांच्या संख्येनंही उच्चांक गाठला.
-
भारतात करोनाची दुसरी लाट ही डेल्टा व्हेरिएंटमुळे (B.1.617) आली होती, असं तज्ज्ञांनी सांगितलं. या व्हेरिएंटमुळे करोना विषाणूचा प्रसार वेगाने होत होता.
-
डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार देशातील सर्व राज्यांमध्ये झाला. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगाणामध्ये दिसून आला.
-
दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला.
-
ऑक्सिजन, बेड आणि वैद्यकीय सुविधांअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले.
-
करोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली.
-
करोनामुळे परिस्थिती इतकी भीषण होती की स्मशानभूमित देखील जागा अपुरी पडत होती.
-
लोकांना स्मशानभूमीबाहेर रांगेत उभं राहावं लागत होतं.
-
अनेकांना तर आपल्या जवळच्या लोकांना शेवटचं देखील पाहता आलं नाही.
-
स्मशानभूमीत जागा न मिळाल्यानं अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागले.
-
बिहार आणि उत्तर प्रदेशमधील परिस्थिती तर फारच भीषण होती.
-
इथे स्मशानभूमीत जागा मिळत नसल्याने गंगा नदीच्या काठी वाळूत मृतदेह पुरण्यात आले होते. या मृतदेहांचे मन सुन्न करणारे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
-
इतकंच नव्हे, तर वाळूखाली मृतदेह नीट न पुरल्याने ते वाहून पाण्यात गेले. त्या पाण्यातल्या मृतदेहांचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले होते.
-
एकंदरीत करोनाची दुसरी लाट भारतासाठी अत्यंत घातक ठरली. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)

Sir J J Hospital Doctor Suicide: ‘घरी जेवायला येतो’ असं आईला सांगितलं, घरी जाताना डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; आत्महत्येचं कारण आलं समोर