-
लातूर येथे धनंजय मुंडे यांच्या भाचीचं लग्न पार पडलं.
-
भाची तेजश्री वामनराव केंद्रेंच्या लग्नासाठी धनंजय मुंडे सकाळपासूनच उपस्थित होते.
-
हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले.
-
दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईंसोबत हजेरी लावली.
-
विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे बहीण भाऊ राजकीय वैमनस्य सोडून एकत्र आल्याचं पहायला मिळालं.
-
राजकीय मैदानात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे भाऊ बहिण यावेळी मात्र मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले.
-
लग्न सोहळ्यामध्ये जवळपास दोन तास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित बसले होते.
-
दरम्यान यावेळी बहिण भाऊ बराच वेळ गप्पा मारत होते. तसंच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र बसून जेवणदेखील केलं.
-
यावेळी धनंजय मुंडे यांनी चक्क बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला. धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत एका गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळाला. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत तसंच आवाज देत उत्साह वाढवत होते.
-
यावेळी धनंजय मुंडे यांनी चक्क बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला असून त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
-
विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत ‘आपका क्या होगा जनाबे आली’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळाला. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत तसंच आवाज देत उत्साह वाढवत होते.

Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण