-
युरोपमध्ये भयंकर दुष्काळ पडला आहे. अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. युरोपमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही कमतरता जाणवत आहे.
-
पाण्याची पातळी खालवल्यामुळे युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान जलसमाधी मिळालेल्या युद्धनौका प्रथमच दृष्टीस पडू लागल्या आहेत.
-
१९४४ मध्ये डॅन्यूब नदीत बुडालेली जर्मन युद्धनौका जलस्तर घटल्यानं दिसू लागली आहे. ही युद्धनौका नाझी नौदलाचा भाग होती.
-
काळ्या समुद्रातील आघाडी सांभाळण्याची जबाबदारी या नौकेवर होती.
-
आतापर्यंत २० नौका पाणी पातळीत घट झाल्यानं दिसून आल्या आहेत.
-
यापैकी अनेक नौकांवर अद्यापही स्फोटकं आणि शस्त्रसाठा आहे.
-
दुष्काळामुळे नदीचे पाणी आटल्यामुळे बुडालेल्या युद्धनौका वर आल्या आहेत. परिणामी नदीतून वाहतूक कऱणाऱ्या इतर नौकांना अडचण निर्माण होत आहे.
Asia Cup 2025: युएईच्या कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज