-
भारतीय वायुदलाचा लढाऊ गणवेश बदलवण्यात आला असून शनिवारी चंदीगड येथे झालेल्या एअर फोर्स डे परेडमध्ये नव्या गणवेशाचे अनावरण करण्यात आले.
-
हा गणवेश वायुदलाचे ऑपरेशन लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आला आहे. यात बूट, टी-शर्ट, वेब बेल्ट आणि टोपीचाही समावेश करण्यात आला आहे.
-
वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांच्या उपस्थितीत या गणवेशाचे अनावरण करण्यात आले.
-
१९३२ मध्ये युके रॉयल सैन्यात एअर फोर्सचा अधिकृत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे हा दिवस वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
केंद्र सरकारने वायुदलासाठी नवीन शस्त्र प्रणाली मंजूर केली असल्याची माहितीही यावेळी एअर चीफ मार्शल चौधरी यांनी दिली.
-
तसेच पुढील वर्षापासून वायुदलात महिला अग्निवीरांचा समावेश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
-
यावेळी विंग कमांडर विशाल जैन यांच्या नेतृत्वाखाली ३ Mi-17 V5 हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिकही सादर करण्यात आले.
-
यावेळी वायुदलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि रक्षा मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.
-
या वर्षीच्या सोहळ्याची थीम ‘IAF: ट्रान्सफॉर्मिंग फॉर द फ्युचर’ अशी होती.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल