-
“नाव बच्चू आणि आडनाव कडू असलं तर मी गोड आहे. कितीही खाल्लं तर मधूमेह होत नाही”, असा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी अस्सल वऱ्हाडी भाषेत फटकेबाजी केली आहे.
-
अमरावतीत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
-
बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.
-
याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
-
मात्र, बच्चू कडू यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार म्हटले होते.
-
दरम्यान, आज बच्चू कडू यांनी अमरावती आयोजित मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले.
-
“प्रहार आंडू पांडूचा पक्ष नाही, आम्ही संख्येने कमी असलो तरी बाजी आहोत.”
-
“आम्ही कोणाच्या वाटाल्या जात नाही आणि कोणी वाटाल्या गेलं तर त्याचा कोथडा काढल्या शिवाय राहत नाही.”
-
“विनाकारण तोंड माराल, तर आम्ही तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही, सत्तेची आम्हाला परवा नाही”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
-
“मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडतो, तेव्हा कोणत्या बिल्डराच्या घरी जात नाही. आम्ही मंदिर, मशीद, धर्म, जातीचं राजकारण केलं नाही. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नाही”, असेही ते म्हणाले.
-
“आम्ही छोटा पक्ष असलो, तरी दिलदार आहोत. नाव बच्चू आणि आडनाव कडू असलं तरी मी गोड आहे. कितीही खाल्लं तर मधूमेह होत नाही”, असेही ते म्हणाले.
-
“जेवढी प्रसिद्धी मला मीडियाने गेल्या काही दिवसांत दिली, तेवढी मला शेतकरी आंदोलनादरम्यान दिली असती, तर पाच-सहा मागण्या मी पूर्ण करून दाखवल्या असत्या”, असेही ते म्हणाले.
-
यावेळी त्यांनी रवी राणा यांच्याशी सुरू असलेल्या वादावरही भूमिका स्षष्ट केली.
-
“ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही”, असा इशारा त्यांनी रवी राणा यांना दिला.
-
तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचे ते म्हणाले.

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा