-
कथित पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील १०२ दिवसांपासून ते आर्थर रोड तुरुंगात होते. मात्र, अखेर न्यायालयाने संजय राऊतांना दिलासा दिला आहे.
-
त्याच पार्श्वभूमीवर अटक ते जामीन असा घटनाक्रम जाणून घेणार आहोत. २७ डिसेंबर २०२० रोजी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पहिल्यांदा समन्स बजावलं होतं.
-
त्यानंतर ४ जानेवारी २०२२ रोजी वर्षा राऊत यांची ईडीने साडेतीन तास चौकशी केली होती. ११ जानेवारी २०२२ रोजी वर्षा राऊत यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बाजवण्यात आलं.
-
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना २ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली.
-
त्यानंतर ५ एप्रिल २०२२ रोजी ईडीने संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आली. २७ जून २०२२ ला पहिल्यांदा संजय राऊतांना चौकशीसाठी समन्स बजावले.
-
२८ जून २०२२ राऊतांनी वकिलामार्फत ७ ऑगस्टपर्यंत ईडीकडे हजर राहण्यासाठी वेळ मागितली.
-
१ जुलै २०२२ रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात संजय राऊतांची दहा तास चौकशी झाली.
-
नंतर २७ जुलै २०२२ ला संजय राऊतांना चौकशीला राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावलं. मात्र, राऊत चौकशीला हजर राहिले नाहीत.
-
३१ जुलै २०२२ ला ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले.
-
नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. अटकेनंतर आठ दिवसांची संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावण्यात आली.
-
ईडी कोठडी संपल्यानंतर पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली.
-
१९ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी वाढवली.
-
त्यानंतर झालेल्या सुनवाणीत २ नोव्हेंबरपर्यंत संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली. त्यामुळे संजय राऊतांची दिवाळी तुरुंगात गेली.
-
राऊत यांच्या जामिनाबाबत ईडीने २ नोव्हेंबर रोजी लेखी उत्तर सादर केलं. नंतर न्यायालयाने निकाल ९ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला.
-
आज ( ९ नोव्हेंबर ) संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी पार पडली. यावेळी पीएमएल न्यायालयाने संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर केला आहे. ( छायाचित्र सौजन्य – अमित चक्रवर्ती, नरेंद्र वास्कर, अनिल शर्मा, गणेश शिरसेकर )

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या