-
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर भारतात पोहचली आहे.
-
या यात्रेवरून सत्ताधारी पक्षाने कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर अनेक गोष्टींवरून टीका केली असली तरी अनेकांनी यावेळी राहुल गांधी यांच्या तंदुरुस्तीचे आणि चिकटीचे कौतुकही केले आहे.
-
या भारत जोडो यात्रेला राम मंदिराचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राहुल गांधी यांना त्यांनी एक पत्र लिहून आशीर्वादही दिले.
-
तसेच महंत जन्मजेय यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला शुभेच्छा दिल्या आहेत. महंत जन्मेजय हे जानकी घाटाचे पुजारी आहेत.
-
भारतमातेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आवडणारच, असं त्यांनी म्हटलं आहे.
-
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पंजाब येथील यात्रा सुरू करण्याच्या एक दिवस आधी आज मंगळवारी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
-
यावेळी ते सुवर्ण मंदिरात जाऊन नतमस्तक झाले. मंगळवार १० जानेवारीला ‘भारत जोडो’ यात्रेचा हरियाणा दौरा अंबाला येथे पूर्ण झाला.
-
पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले की राहुल गांधी अमृतसर येथे काही तास थांबून सायंकाळी फतेहगड साहिब येथे पोहोचतील.
-
याआधी, राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी अंबाला कॅन्टमधील शाहपूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. यादरम्यान, माजी खासदार आणि काँग्रेस नेते राज बब्बरही या यात्रेत सहभागी झाले होते.
-
गुरुवारी ही यात्रा उत्तर प्रदेशातून पानिपतमार्गे हरियाणात दाखल झाली. पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र मार्गे अंबाला येथे पोहोचले.
-
गेल्या २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ही यात्रा मेवात, फरिदाबाद आणि हरियाणातील इतर काही भागातून गेली.
-
ही यात्रा बुधवारी मंडी गोविंदगडमार्गे जाणार असून खन्ना येथे रात्रीचा मुक्काम असेल. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले की, यात्रेअंतर्गत दररोज दोन टप्प्यात सुमारे २५ किलोमीटरचे अंतर पार केले जाईल. (Twitter: @INCIndia)

२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…