-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपला.
-
यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी त्याला प्रत्युत्तर देत युक्तिवाद केला.
-
नीरज कौल यांनी नेमका काय युक्तिवाद केला, याचा हा आढावा…
-
न्यायालयासमोर करण्यात आलेला युक्तिवाद हा राज्यघटनेच्या तत्वानुसार बोम्मई आणि शिवराजसिंह चौहान प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालांच्या विरुद्ध होता – नीरज कौल
-
बोम्मई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं होतं की अशा प्रकरणात बहुमत चाचणी हाच एकमेव मार्ग असू शकेल. तोच पर्याय राज्यपालांनी निवडला – नीरज कौल
-
अनेक आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता. मंत्रालयातही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं होतं की, त्यांचा सरकारवर विश्वास राहिला नाही – नीरज कौल
-
विधिमंडळ पक्षातल्या मोठ्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला होता. या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगणं हाच एकमेव मार्ग शिल्लक होता – नीरज कौल
-
राज्यपालांनी नेमकं काय करायला हवं होतं? ७ अपक्ष आमदार म्हणतायत की आमचा सरकारवर विश्वास नाही, ३४ आमदार म्हणतात की त्यांचा मंत्रालयावर विश्वास नाही – नीरज कौल
-
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असलेल्या आमदारांना वगळूनही आम्ही बहुमतामध्ये आहोत – नीरज कौल
-
फक्त अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे म्हणून तुम्ही एखाद्या आमदाराला विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापासून रोखू शकत नाही – नीरज कौल
-
विरोधी पक्ष, ७ अपक्ष आणि ३४ आमदारांनी राज्यपालांच्या लक्षात आणून दिलं की त्यांचा उद्धव ठाकरे सरकारवर विश्वास नाही. त्यानंतर राज्यपालांनी बोम्मई प्रकरणाप्रमाणे प्रक्रिया पाळत बहुमत चाचणीसंदर्भात निर्देश दिले – नीरज कौल
-
राज्यपालांनी फक्त एवढंच सांगितलं की, तुम्ही समोर येऊन तुमचं बहुमत सिद्ध करा – नीरज कौल
-
त्यांनी कुणालाही तेव्हा सरकार स्थापन करायला बोलवलं नाही. पण त्यानंतर उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत – नीरज कौल
-
जे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाऊ शकत नाही, अशा सरकारला सत्तेत कसं राहू दिलं जाऊ शकतं? – नीरज कौल
-
सर्वोच्च न्यायालयानेच अनेक प्रकरणात राज्यपालांना असं सागितलंय की, अशावेळी सर्वात आधी अधिवेशन बोलवून बहुमत चाचणी घ्यायला हवी – नीरज कौल
शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांना जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले? वाचा महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपला. यानंतर ठाकरे गटाचे वकील नीरज कौल यांनी नेमका काय युक्तिवाद केला याचा हा आढावा…
Web Title: Important argument of shinde faction advocate neeraj kaul in supreme court shivsena maharashtra political crisis pbs