-
राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिंदे गटात काही दिवसांपासून काही ना काही कारणावरून वादाची ठिणगी पडताना दिसत आहे.
-
आधी ठाण्यातील वादानंतर भिडलेले भाजपा-शिंदे गटाचे नेते नंतर एकनाथ शिंदे यांना सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून आमने-सामने आलेले पाहायला मिळाले.
-
यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर भाषणात यावर भाष्य केलं. ते गुरुवारी (१५ जून) पालघरमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. एक पत्रकार आला आणि म्हणाला की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं आहे? – देवेंद्र फडणवीस
-
आमचा २५ वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे – देवेंद्र फडणवीस
-
त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही – देवेंद्र फडणवीस
-
आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल – देवेंद्र फडणवीस
-
कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही – देवेंद्र फडणवीस
-
हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे म्हणून तयार केलं आहे – देवेंद्र फडणवीस
-
एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही – देवेंद्र फडणवीस
-
हे जुनं सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे – देवेंद्र फडणवीस (सर्व छायाचित्र – संग्रहित)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर