पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे हे नाव चर्चेत आलं.राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार असलेले सुनील टिंगरे पहाटे येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गेले होते.यावरून अपघातातील पोर्श कार चालवणाऱ्या आरोपीच्या बचावासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जात होता.पोर्श कार चालक आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर टिंगरे यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये पहाटे भेट दिल्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीका झाली.बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोपही होतोय. त्यावर आमदार टिंगरे यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.या आरोपांवर स्पष्टीकरण देणारी एक मोठी पोस्ट त्यांनी सोशल मीडीयावरून शेअर केली आहे. दरम्यान, आमदार सुनील टिंगरे कोण आहेत? हे पाहूयातराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी अजित पवार गटासोबत जायचं ठरवलं.२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वडगाव शेरी या मतदारसंघातून निवडून आले.त्याआधी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ते मैदानात उतरले होते परंतु त्यांचा पराभव झाला होता.त्याआधी आमदार सुनील टिंगरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील कार्यरत होते.(सर्व फोटो सुनील टिंगरे या फेसबुक खात्यावरून साभार)