-
अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. (All Photos- Prem Singh Tamang/X)
-
यात अरुणाचल प्रदेशात ६०पैकी ४६ जागा मिळवून भाजपाने एकतर्फी विजय मिळविला. सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) पक्षाने ३२ पैकी ३१ जागा जिंकून निर्भेळ यश मिळविले.
-
तेथे भाजपाचे सर्व १२ आमदार पराभूत झाले असले, तरी निकालानंतर एसकेएमचे नेते व मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच राहणारं असल्याचे म्हटले आहे.
-
तमांग यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत १७ जागांवर विजय मिळवला होता.
-
त्यांच्या या विजयामुळे जवळपास पाच टर्म सत्तेत असलेलं चामलिंग यांचं तख्त पलटी झालं.
-
प्रेमसिंग तमांग पवनकुमार चामलिंग यांच्या एसडीएफ या पक्षाचे सदस्य होते. त्यांनी २०१३ मध्ये बंडखोरी केली तसेच एस.के.एम. या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली.
-
भ्रष्टाचार ते कुशासन असे लोकांच्या मनात घर करणारे मुद्दे घेऊन त्यांनी वर्षभरातच झालेली विधानसभा निवडणूक लढवत, त्यामध्ये १० जागांवर विजय मिळवला.
-
दरम्यान प्रेमसिंग तमांग हे एका सरकारी शाळेचे शिक्षक होते. त्यांनी तीन वर्ष नोकरी केली. त्यानंतर राजकीय प्रवेश करून त्यांची कारकीर्द सुरु झाली. एसडीएफ पक्षाच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा मानाला जातो.
-
खडतर वाटचालीतून पुढे आलेले प्रेमसिंग तमांग, १९९५ सालापासून सलग ५ वेळा विधानसभेवर निवडून गेले. एसडीएफमध्ये असताना ते मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम करत होते.
-
प्रेमसिंग तमांग यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरवून त्यांना २०१६ मध्ये तुरुंगवास झाला.
-
दोन वर्ष झाल्यांनतर २०१८ मध्ये ते तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक