-
ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते ओम बिर्ला यांनी १७ व्या लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. इंडियन एक्स्प्रेसने घेतलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे जुन्या आणि नवीन संसद भवनातील काही खास छायाचित्रे पाहूयात. (रेणुका पुरी यांचे एक्सप्रेस फोटो)
-
आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची स्पीकर म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यासमोर, इंडिया आघाडीने केरळमधील मावेलीकारा येथून ८ वेळा खासदार राहिलेले कोडीकुन्नील सुरेश यांना उमेदवारी दिली होती.
-
जुन्या संसद भवनातील हे छायाचित्र आहे. लोकसभा अध्यक्षांनी याच खुर्चीवर बसून १७ व्या लोकसभेच्या कार्यकाळात अनेक मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले.
-
ओम बिर्ला यांचे हे छायाचित्र जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनाकडे जाताना काढण्यात आले आहे. ओम बिर्ला कोटा बुंदी मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
-
ओम बिर्ला हे दोन्ही सभागृहात लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करणारे देशातील पहिले सभापती आहेत. १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक, २०१९ (कलम ३७०), नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए), तिहेरी तलाक (मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक २०१९), निवडणूक कायदा (सुधारणा) सादर विधेयक, भारतीय न्यायिक संहिता २०२३, नारी शक्ती वंदन विधेयक २०२३ यासह, महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण असे अनेक महत्त्वाचे कायदे मंजूर केले.
-
दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष झालेल्या ओम बिर्ला यांनी एक विक्रम त्यांच्या नावावर केला आहे. परंतु ओम बिर्ला त्यांचा हाही पाच पूर्ण वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील तर १० वर्षांच्या पूर्ण दोन टर्मसाठी लोकसभा अध्यक्षपदावर राहण्याचा आणखी एक विक्रम होणार आहे.
-
ओम बिर्ला यांच्या आधी, जीएमसी बालयोगी, बलराम जाखड, नीलम संजीव रेड्डी, गुरुदयाल सिंह ढिल्लन आणि एम अय्यंगार हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत, परंतु त्यापैकी कोणीही त्यांचा दुसरा कार्यकाळ (१० वर्षे) पूर्ण केला नाही.
-
या चित्रात ओम बिर्ला दोन्ही संसद भवनांच्या (जुन्या व नवीन) मध्यभागी उभे आहेत. ओम बिर्ला सामाजिक कार्यातही खूप पुढे आहेत. ते दिव्यांगांना मदत करतात त्यांनी रुग्णालयांच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना जीवन उपयोगी मदत दिली आहे. हेही पहा- PHOTOS : “मी भारत माता की जय म्हणणार नाही!”, जय पॅलेस्टाईनपूर्वी असदुद्दीन ओवेसी यांन…

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”