-
ब्रिटनमधील निवडणूक निकालांमध्ये ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, मजूर पक्ष १४ वर्षानंतर सत्तेत परतला. आता कीर स्टार्मर देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत. (फोटो: एपी)
-
सार्वत्रिक निवडणुकांमधील नेत्रदीपक विजयानंतर ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये कीर स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळातील २५ मंत्र्यांमध्ये तब्बल ११ महिलांचा समावेश आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
यामध्ये भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांना सांस्कृतिक मंत्रीपद देण्यात आले आहे. ४४ वर्षीय नंदी यांना कीर सरकारमध्ये सांस्कृतिक, मीडिया आणि क्रीडा राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्या विगनमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
विगन या जागेवरून मजूर पक्षाच्या उमेदवार म्हणून लिसा नंदी पाचव्यांदा निवडून आल्या आहेत. नंदी यांचा जन्म मँचेस्टरमध्ये वडिल दीपक नंदी आणि आई लुईस यांच्या पोटी झाला. मुळचे भारतातील कलकत्ता येथील असलेले दीपक नंदी हे लिसा यांचे वडिल आहेत. ते शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दीपक यांनी ब्रिटीश असलेल्या लुईस यांच्याशी विवाह केला होता. (फोटो: @lisanandymp/instagram)
-
लिसा नंदी यांचे शिक्षण पार्सन्स वुड हायस्कूल आणि होली क्रॉस कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर नंदी यांनी न्यूकॅसल विद्यापीठात राजकारणाचा अभ्यास केला. त्यानंतर, २००३ मध्ये त्यांनी बर्कबेक कॉलेज, लंडन विद्यापीठात Public policy चा अभ्यास केला. (फोटो: @lisanandymp/instagram)
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, लिसा यांनी वाल्थमस्टोचे खासदार नील गेरार्ड यांची सहाय्यक म्हणून काम केले. गेरार्ड हे सेंटर पॉईंटचे संशोधक होते, सेंटर पॉईंट ही एक धर्मादाय संस्था आहे जी मुख्यतः बेघरांसाठी काम करते. (फोटो: @lisanandymp/instagram)
-
लिसांनी इंग्लंडसाठी चिल्ड्रन कमिश्नर आणि इंडिपेंडेंट असाइलम कमीशनच्या सल्लागार म्हणूनही काम केले आहे. नंदी यांच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचे तर, गेल्या १४ वर्षांपासून त्या विगन मतदारसंघातून मजूर पक्षाच्या खासदार आहेत. (पीटीआय फोटो)
-
त्यांनी अनेकदा मजूर पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये भारताबद्दल त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्यांचे आजोबा फ्रँक बायर्स मजूर पक्षाचे खासदार राहिले आहेत. (फोटो: रॉयटर्स)
हेही वाचा- PHOTOS : ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची नेत्रदीपक कामगिरी, कीर स्टार्मर नवे पंतप्रधान; हुजूर पक्षाचा ऐतिहासिक पराभव!

India On Trump : ‘अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत…’, ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर