-
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भेटीवरून आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
विधानसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ, अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून शरद पवार यांच्याकडे परत जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, आपण आज छगन भुजबळ यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे जाणून घेऊया. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
छगन भुजबळ हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. सध्या ते येवला विधानसभेचे आमदार आहेत. १९९९ ते २००३ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
छगन भुजबळ यांनी १९६० च्या दशकाच्या काळात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विक्रेते म्हणून काम करत होते. तिथे त्यांच्या आईचे छोटेसे दुकान होते. १९७३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. १९७३ ते ८४ ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर १९९१ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
एकेकाळी भाजीविक्रेते असलेले छगन भुजबळ आज करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत. myneta.info वेबसाइटनुसार, २०१९ मध्ये भुजबळांची एकूण संपत्ती २६ कोटी रुपये होती. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
त्यांची पत्नी आणि त्यांच्या स्वतंत्र बँक खात्यात ७४ लाख रुपये जमा आहेत. याशिवाय त्यांनी बाँड, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये सुमारे २८ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे ४० लाख रुपयांचे दागिने आहेत. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
छगन भुजबळ यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रात सात कोटी रुपयांहून अधिक किमतीची शेतजमीन आहे. याशिवाय सहा कोटींहून अधिक किमतीची बिगरशेती जमीन आहे. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
मुंबईतील वरळी मध्ये एक आणि माझगावमध्ये एक घर छगन भुजबळ यांच्या नावावर आहे.सध्या या घरांची किंमत अंदाजे प्रत्येकी ४ कोटी ८१ लाख रुपये आहे. (@Chhagan Bhujbal/IFB)
-
याशिवाय महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात ५ कोटी २१ लाख तेरा हजार रुपये किमतीची आणखीनही घरे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. भुजबळांकडे एकूण २४ कोटींची मालमत्ता आहे. (@छगन भुजबळ/IFB) हेही पाहा- विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी! पाहा फोटो

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल