-
भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुंबई महापालिकेने नूतनीकरण केले आहे.
-
या नुतनीकरणासाठी तीन कोटी रुपये खर्च आला आहे.
-
दरम्यान, आज या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
-
यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार राजहंस सिंह, महापालिका आयुक्त भूषण गगराणी व इतर उपस्थित होते.
-
दरम्यान, आता संग्रहालय अतिशय आकर्षक दिसते आहे.
-
संग्रहालयाचे हे आजचेच फोटो आहेत.
-
दुरुस्तीची कामे व इतर कारणांमुळे संग्रहालय चार वर्षे बंद होते.
-
आता नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
-
संग्रहालयाला भेट देण्याची वेळ
सकाळी १० – संध्याकाळी ५:०० (शेवटचं तिकिट ४.३० वाजता देण्यात येईल) -
बुधवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी संग्रहालय बंद राहिल
-
(सर्व फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

India vs England: सिराजची अनलकी विकेट, जडेजा शेवटपर्यंत लढला! लॉर्ड्सवर भारताचा पराभव