-
विमान अपघात तपास ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात असे दिसून आले की, १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे हा घातक अपघात झाला. उड्डाण डेटा आणि देखभाल नोंदीचे पुढील विश्लेषण सुरू असून, तपास सुरू आहे. (Photo: AAIB)
-
अहमदाबाद विमानतळाजवळील अपघात स्थळाजवळील निवासी इमारतीत सर्वत्र माती आणि कोसळलेल्या विमानाचे ढिगारे दिसत आहेत. (Photo: AAIB)
-
इमारतीच्या भिंतीच्या वर विमानाचा मागच भाग आणि उजवा मुख्य लँडिंग गियर दिसत आहे. (Photo: AAIB)
-
विमानाचे मागचे उभे स्टॅबिलायझर अपघाताच्या ठिकाणापासून २०० फूट अंतरावर आढळले. (Photo: AAIB)
-
इमारतीच्या वरच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीला धडकल्यानंतर विमानाचे उजवे इंजिन वेगळे झाले. (Photo: AAIB)
-
इमारती अ आणि इमारती ब मध्ये उजव्या पंखाचा काही भाग मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आढळला. पहिल्या संपर्क बिंदूपासून ५०० फूट अंतरावर पंखाचा आउटबोर्ड भाग सापडला. (Photo: AAIB)
-
बिल्डिंग सी च्या वरच्या मजल्यांमध्ये डाव्या मुख्य लँडिंग गियरचा आणि डाव्या बाजूचा मधला भाग घुसला होता. (Photo: AAIB)
-
डावे इंजिन बिल्डिंग डी च्या पायथ्याशी आदळले आणि त्यामुळे भिंतीचे मोठे नुकसान झाले. (Photo: AAIB)
-
बिल्डिंग ए सोबत झालेल्या सुरुवातीच्या धडकेच्या नैऋत्य दिशेला ३००हून अधिक फूट अंतरावर नोज लँडिंग गियर आढळले. (Photo: AAIB)
-
इमारत C ते F पर्यंत फ्युजलेज सेक्शन (विमानाचा मुख्य भाग) तुटला गेला. विमानाचे अवशेष ७०० फुटांपेक्षा जास्त जागेवर पसरलेले दिसत आहेत. जमिनीवर विमान वेगाने आदळण्याचे हे संकेत आहेत. (Photo: AAIB)
-
लँडिंग गियर “खाली” केलेला दिसून येत आहे. टेकऑफ घेतल्यानंतर ही सामान्य परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. (Photo: AAIB)
-
थ्रस्ट लीव्हर क्वाड्रंट गंभीर स्थितीत बाहेर काढण्यात आला. (Photo: AAIB)
-
ढिगाऱ्यातून एन्हांस्ड एअरबोर्न फ्लाइट रेकॉर्डर्स (EAFR) आणि इतर साहित्य गोळा केले गेले. जे अतिशय खराब स्थितीत असल्याचे दिसत आहे. (Photo: AAIB)
-
सीसीटीव्ही फुटेजनुसार, रॅम एअर टर्बाइन (RAT) उड्डाणानंतर लगेचच तैनात करण्यात आले. RAT च्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण वीज बंद झाल्याचे कळते. ज्यामुळे आपत्कालीन प्रणाली स्वयंचलितपणे तैनात होते. (Photo: AAIB)

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती